Ratnagiri Voter list  BLO At Home Ratnagiri Marathi News 
कोकण

बापरे ! रत्नागिरीत हिटलिस्टवर चार हजार नऊशे संशयित मतदार

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रममात बीएलओ घरोघरी जावून मतदारांची माहिती घेणार आहेत. तिथेच ऑनलाईन हॅबरिट ॲपद्वारे दुरुस्ती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १३ लाख १० हजार ०११ मतदार आहेत. त्यापैकी ४ हजार ९०० मतदार संशयास्पद आहेत. त्यांची दोन ठिकाणी मतदान आहे, असे हे मतदार आहे. या शुद्धीकरण कार्यक्रमात संबंधिताकडून योग्य तो फॉर्म भरून तेथील नाव कमी केले जाईल, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे यांनी दिली.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. मतदान शुद्धीकरण कार्यक्रम ११ नोव्हेंबर २०१९ पासून सुरू झाला आहे. १३ फेब्रुवारी २०२० पर्यंत हा कार्यक्रम आहे. त्यामध्ये मतदार पडताळणी, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण, प्रमाणीकरण सारख्या इतर पूर्वपुनर्रिक्षण कार्यक्रम होणार आहे. २८ फेब्रुवारीला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध, २८ फेब्रुवारी ते २७ मार्च २०२० दावे व हरकती स्वीकारणे, , , १४, १५ मार्चला विशेष मोहीम, १५ एप्रिलला दावे व हरकती निकाली काढणे, २४ एप्रिलला अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी घेणे, ३० एप्रिलला डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई, ५ मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे
हेही वाचा - सूर्याला डोऴा भिडवणारा अवलिया....

 बीएलओ पोचणार प्रत्येक घराघरात 
जिल्ह्यातील आताचे मतदार १३ लाख १० हजार ०११ आहेत. आता या शुद्धीकरण कार्यक्रमातून बीएलओमार्फत आम्ही प्रत्येक घराघरात पोचणार आहे. त्यामध्ये मतदाराचे नाव, लिंग, नातेवाईकाची माहिती चुकली असेल किंवा स्थलांतरीत, मयत झाला असेल तर त्याची माहिती भरुन तिथेच त्याचे शुद्धीकरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाची मुदत नोव्हेंबर २०१९ होती. मात्र, त्याला मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे मतदारांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन आपले मतदान कार्ड अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे
क्लिक करा मॅगोनेट खेचणार आंबा विक्रेत्यांना...

निवडणूक विभागाच्या हिटलिस्टवर...
काही मतदारांची दोन ठिकाणी नावे आहेत. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी किंवा अन्य जिल्ह्यात नाव असल्याची माहिती पुढे आली आहे. निवडणूक विभागाच्या हिटलिस्टवर असे ४ हजार ९०० संशयित मतदार आहे. याची योग्य ती चौकशी करून त्यांच्याकडून ८ नंबरचा फॉर्म भरुन हा विषय निकाली काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT